
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्यादरम्यान केलेल्या कृतीबद्दल अखेर पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदने माफी मागीतली आहे.Gujarat Giants Women Beat Delhi Capitals Women: रोमहर्षक सामन्यात गुजरातने दिल्लीचा केला पराभव, हरलीन देओलची 70 धावांची शानदार खेळी
अबरार अहमद याने मागितली माफी
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला होता. टीम इंडियाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदने टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. गिलला बाद केल्यानंतर अबरार हावभाव करताना दिसला. ज्यावर भारतीय चाहत्यांनीही आपला आक्षेप व्यक्त केला. आता अबरारने याबद्दल माफी मागितली आहे.
"ही माझी शैली आहे आणि मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही," अबरार अहमद यांनी टेलिकॉम एशिया स्पोर्टसोबत बोलताना म्हटले. मी काही चूक केली आहे असे कोणत्याही अधिकाऱ्याने मला सांगितले नाही. परंतु जर यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.”
Abrar Ahmed on his send off to Shubman Gill:
"I had no intentions to hurt anyone, but if I did hurt anyone, I'm sorry for it". pic.twitter.com/0Nb9iYFDzu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2025
अबरार विराटबद्दल काय म्हणाला?
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करत शतक झळकावले. कोहलीबद्दल, अबरार अहमद म्हणाला, 'विराटने सामन्यानंतर म्हटले, 'चांगली गोलंदाजी' आणि त्यामुळे माझा दिवस बनला, हा माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण आहे.'
भारताविरुद्धच्या सामन्यात अबरार अहमदने चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 10 षटकांत फक्त 28 धावा देत 1 विकेट घेतली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. साखळी सामन्यांमध्ये पराभव पत्करल्याने पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला. या स्पर्धेत पाकिस्तानला एकही विजय मिळवता आला नाही.