KKR vs SRH (Photo Credit - X)

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.

किती वाजता सुरु होणार सामना?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2025 चा 15 वा सामना गुरुवारी, 03 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर KKR विरुद्ध SRH आयपीएल 2025 चा 15 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स- सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, अंगकृष्ण रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

प्रभावशाली खेळाडू - वैभव अरोरा

सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि झीशान अन्सारी

प्रभावशाली खेळाडू - अ‍ॅडम झांपा