Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावले (Harry Brook Triple Century) आहे. हॅरी ब्रूकच्या कारकिर्दीतील हे पहिले त्रिशतक आहे. हॅरी ब्रूकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव 823/7 धावांवर घोषित केला. कसोटी इतिहासातील एका डावातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 5 सर्वात मोठी धावसंख्या
कसोटी इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने भारताविरुद्ध ही धावसंख्या केली होती. ऑगस्ट 1997 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताविरुद्ध 952/6 धावा केल्या होत्या.
Highest Team total in Test Cricket History:
Sri Lanka - 952/6 in 1997.
England - 903/7 in 1938.
England - 849/10 in 1930.
England - 823/7* in 2024.
- England Made 4th Highest score in Test Cricket History. 🤯 pic.twitter.com/XNAXrNq29j
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 10, 2024
या यादीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने 903/7 धावा ठोकल्या होत्या.
त्यानंतर या यादीत पुढे जात इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. एप्रिल 1930 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इंग्लिश संघाने 849/10 धावा केल्या होत्या.
यानंतर इंग्लंडही चौथ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लिश संघाने 823/7* धावा केल्या.
वेस्ट इंडिज या यादीत पाचव्या स्थानावर आहे. फेब्रुवारी 1985 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने 790/3 धावा केल्या होत्या.