Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सोमवारी रात्री मुंबईतील (Mumbai)) एका क्रिकेटपटूचा त्याच्या मालाड (पूर्व) निवासस्थानी मृत आढळले. आयपीएलच्या (IPL) आठही संघात खेळायला न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. 25 वर्षीय करण तिवारीचा (Karan Tiwari) मृतदेह आपल्या खोलीतील  पंख्यावर लटकलेला आढळला. करणला स्थानिक क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शरीरयष्टी आणि तत्सम गोलंदाजीच्या कारणामुळे 'ज्युनिअर डेल स्टेन'चे नाव देण्यात आले. कोंकू कंपाऊंड, गोकुळधाम येथे रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. मिड-डेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) नोंदविला आहे. कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले आहेत की, “आम्ही एडीआर नोंदविला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.” कुरार पोलिसाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने करण निराश होता.

आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती देण्यासाठी करणने उदयपुर येथे राहणाऱ्या आपल्या जवळच्या मित्राला फोन कसून सांगितले. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्याने तो निराश झाला होता. त्यानंतर त्याच्या मित्राने त्याच्या बहिणीला जी त्याच शहरात राहते तिला माहिती दिली जिने आईला फोन करून माहिती दिली, पण तोवर बराच उशीर झाला होता. बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही वयोगटातील राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणारे असेच खेळाडू आयपीएल लिलावात प्रवेश घेण्यास पात्र आहेत, पण करणने कधीही राज्यासाठी प्रथम श्रेणी, यादी किंवा टी-20 सामना खेळला नव्हता.

गेल्या हंगामात वानखेडे येथे करणने आयपीएल संघासाठी अनेकदा गोलंदाजी केली असली तरी बीसीसीआयचे नियम पाळत नसल्याने त्याला संधी मिळाली नाही. पोलिस सुत्रांनी असेही म्हटले आहे की करण नोकरी नसल्याने तणावग्रस्त होता.