2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: अ गटातील अंतिम सामन्यात पाकिस्तानला (NZ W)ऑस्ट्रेलियासोबत (AUS W)उपांत्य फेरी गाठण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार होता. मात्र, न्यूझीलंड जिंकल्याने पाकिस्तानचा विश्वचषकातील खेळ (2024 ICC Women’s T20 World Cup)संपला. पाकिस्तान थोड्या फरकाने जिंकला तर भारत पुढे गेला असता. सामन्याच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडने विजयाचा कौल त्यांच्याकडे वळवला होता. कारण, पॉवरप्लेपूर्वी त्यांनी एकही विकेट न गमावता 39 धावा केल्या होत्या. मात्र, मधल्या काही षटकांत तीन विकेट्स घेत व्हाइट फर्न्सची धावसंख्या रोखण्यात पाकिस्तानला यश आले. यानंतर सोफी डेव्हाईन आणि ब्रूक हॅलिडे यांनी चौथ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. पाकिस्ताननेही संपूर्ण सामन्यादरम्यान आठ झेल सोडले.
न्यूझीलंड संघाने शेवटच्या दोन षटकात 14 धावा करत 110 चे टार्गेट पाकिस्तान पुढे ठेवले होते. नशरा संधूने 18 धावांत 3 बळी घेतले. पाकिस्तानला 111 धावांचे लक्ष गाठायचे होते. ते सोपे नसल्याने त्यांनी त्यांची फलंदाजी बदलून आलिया रियाझला मुनीबा अलीसोबत सलामीला पाठवले. हा बदल कामी आला नाही. कारण, आलिया रियाझ दुसऱ्याच षटकात बाद झाली. (हेही वाचा: )
इरम जावेदलाही तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली, पण पाचव्या षटकात ती 10 चेंडूत तीन धावा काढून ती बाद झाली. पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये 28 धावा करत पाच विकेट गमावल्या. यानंतर निदा दार आणि फातिमा सना यांनी चौथ्या विकेटसाठी 24 धावा जोडल्या. त्यानंतर पाकिस्तानचा डाव ५६ धावांत आटोपला. ही महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती.
महिला टी 20 विश्वचषक 2024 गुणतालिका
गट अ
टीम मॅच विन लॉस टाय नेट रन रेट पॉइंट्स
ऑस्ट्रेलिया 4 4 0 0 +2.223 8
न्यूझीलंड 4 2 2 0 +0.879 6
भारत 4 2 2 0 +0.322 4
पाकिस्तान 3 1 2 0 -0.488 2
श्रीलंका 4 0 4 0 -2.173 0
गट ब
टीम मॅच विन लॉस टाय पॉइंट्स नेट रन रेट
इंग्लंड 3 3 0 0 6 +1.716
वेस्ट इंडिज 3 2 1 0 4 +1.708
द,आफ्रिका 4 3 1 0 6 +1.382
बांगलादेश 4 1 3 0 2 -0.844
स्कॉटलंड 4 0 4 0 0 -3.129
निकाल: न्यूझीलंड 20 षटकांत 110-6 (सुझी बेट्स 28, नशरा संधू 3-18) पाकिस्तानचा 11.4 षटकांत 56 (फातिमा सना 21, अमेलिया केर 3-14) 54 धावांनी विजय.