2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: 2024 चा आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. महिला टी 20 विश्वचषक 2024 हा बांगलादेशमध्ये होणार होता. परंतु नंतर तेथील राजकीय गोंधळामुळे तो संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये हलवण्यात आला. 10 संघांची महिला क्रिकेट स्पर्धा आता शारजा आणि दुबई येथे खेळवली जात आहे. स्पर्धेतील अकरावा सामना काल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 60 धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 148 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 88 धावांवर गारद झाला. मेगन शुट, ॲनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी 3 बळी घेत न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येने पराभूत केले.
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाली आहेत. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक संघाचा एकाच गटातील इतर चार संघांशी एकदा सामना होईल आणि त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 18 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती आहे.
महिला टी 20 विश्वचषक 2024 गुण
गट अ
क्र. टीम मॅच विजय पराभव टाय नेट रन रेट गुण
1 ऑस्ट्रेलिया 2 2 0 0 +2.524 4
2 पाकिस्तान 2 1 1 0 +0.555 2
3 न्यूझीलंड 2 1 1 0 -0.050 2
4 भारत 2 1 1 0 -1.217 2
5 श्रीलंका 2 0 2 0 -1.667 0
गट ब
क्र. टीम मॅच विजय पराभव टाय नेट रन रेट गुण
1 इंग्लंड 2 2 0 0 +0.65 3
2 वेस्टइंडीज 2 1 1 0 +1.15 4
3 द. अफ्रीका 2 1 1 0 +0.24 5
4 बांग्लादेश 2 1 1 0 -0.12 5
5 स्कॉटलंड 2 0 2 0 -1.89 7
सर्व संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. दोन्ही गटातील टॉप-2 संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.