India vs Cricket Australia XI: 19 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून विराट कोहलीची विकेट ! (video)
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट Photo Credit : Twitter

India vs Cricket Australia XI: भारतीय क्रिकेट संघामध्ये विराट कोहलीला (Virat Kohali) रनमशीन म्हणून ओळखलं जातं. क्रिकेट खेळातील सार्‍याच प्रकारात विराटच्या नावावर विक्रम आहेत. सध्या भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहे. T20 सामन्यांमध्ये बरोबरी साधत सामन्यांना सुरूवात झाली आहे. 6 डिसेंबरपासून कसोटी सामने (Test Series)  सुरू होणार आहेत. मात्र त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ सध्या अभ्यास मॅच खेळत आहेत. अशाच एका सामान्यामध्ये विराट कोहलीला (viray Kohali)  19 वर्षीय खेळाडूने बाद केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

आरोन हार्डी (Aaron Hardie)  या 19 वर्षीय मुलाच्या बॉलवर विराट कोहलीची विकेट पडली आहे. विराटला आऊट केल्याचा आनंद आरोनच्या चेहर्‍यावरही दिसत होता. विराट कोहलीने या सामन्यामध्ये धडाकेबाज अंदाजात अर्धशतक पूर्ण केलं. एकूण 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला.