
India vs England 2nd Test 2025: बर्मिंगहॅम कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याने विक्रमांची अक्षरशः झडी लावली आहे. त्याने या कसोटीत द्विशतक झळकावत, इंग्लंडमध्ये हा पराक्रम करणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलने 311 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण करत भारतीय क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक झळकावणारे तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे. हा एक असा विक्रम आहे जिथे मोजकेच खेळाडू पोहोचू शकले आहेत. याआधी ही कामगिरी केवळ महान कर्णधारांनी केली होती, आणि आता शुभमननेही ती करून दाखवली आहे.
सर्वात युवा कर्णधार म्हणून द्विशतक
शुभमन गिल आता कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे सर्वात युवा भारतीय कर्णधार बनला आहे. याआधी, मन्सूर अली खान पटौदी यांनी 23 वर्षे 39 दिवसांचे असताना कर्णधार म्हणून द्विशतक झळकावले होते. आता 25 वर्षे 298 दिवसांचे असताना शुभमनने हा पराक्रम करत पटौदींच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill New Record: शुभमन गिलने विराट कोहलीचा 'महारिकॉर्ड' मोडला; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय!)
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 3, 2025
कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतकं
कर्णधार म्हणून कसोटी फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शुभमन गिलचा समावेश झाला आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून तब्बल 7 द्विशतकं झळकावली आहेत, तर मन्सूर अली खान पटौदी यांनी एकदा हा पराक्रम केला आहे. आता शुभमन गिलही या विशेष यादीत सामील झाला आहे.
सेना देशांमध्ये (SENA) द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार
शुभमन गिलने आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. याआधी आशियाई कर्णधाराने सेना देशांमध्ये केलेला सर्वोच्च स्कोअर श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता, ज्याने 2011 मध्ये 193 धावा केल्या होत्या. परदेशी भूमीवर भारतीय कर्णधाराने केलेले हे केवळ दुसरे द्विशतक आहे. यापूर्वी ही कामगिरी फक्त विराट कोहलीनेच केली होती. शुभमन गिलचा हा पराक्रम भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि भविष्यात तो आणखी मोठे विक्रम करेल अशी आशा आहे.