Photo Credit - X

Musheer Khan Accident: मुंबईचा क्रिकेटर मुशीर खान (Musheer Khan) याने रविवारी सांगितले की, लखनौमधील कार अपघातानंतर मला नवीन जीवन मिळाले आहे आणि आता तो बरा आहे. अपघातात मानेला झालेल्या दुखापतीमुळे, 19 वर्षीय मुशीर किमान तीन महिने मैदानाबाहेर असेल, ज्यामुळे तो ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी 2024-25 हंगामाच्या सुरुवातीला मुंबईच्या सामन्यांपासून दूर राहील.  मुशीरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी आता ठीक आहे आणि अपघातावेळी अब्बू (वडील) माझ्यासोबत होते आणि तेही ठीक आहेत. तुमच्या प्रार्थनांसाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Naushad Khan (@musheerkhan.97)

कसा झाला अपघात

1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी चषकासाठी मुशीर त्याच्या मूळ गावी आझमगडहून लखनऊला जात होता. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात किरकोळ जखमी झालेले वडील नौशाद खान हेही त्यांच्यासोबत होते. दुभाजकाला धडकल्याने त्यांची कार पलटली. (हे देखील वाचा: Centre of Excellence in Cricket: BCCI ने बेंगळुरूमध्ये अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्रिकेटचे केले उद्घाटन)

नौशाद खान यांनी बीसीसीआयचे मानले आभार 

नौशाद म्हणाले, "आम्हाला हे नवीन जीवन दिल्याबद्दल मी सर्वप्रथम अल्लाचे आभार मानतो आणि आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे, आमचे सर्व हितचिंतक, चाहते, नातेवाईक यांचे मी आभार मानतो." ते म्हणाले, "मला एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) आणि बीसीसीआयचे आभार मानायचे आहेत जे मुशीरची पूर्ण काळजी घेत आहेत."