मुंबई: भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावरून परतला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सध्या विश्रांतीवर आहेत, मात्र याच दरम्यान एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आनंद होईल. वास्तविक, दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy 2024) 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. रोहित शर्माशिवाय विराट कोहलीही या देशांतर्गत स्पर्धेत पुनरागमन करू शकतो. 5 ते 22 सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होणार असून त्यांना अ, ब, क, ड अशी नावे देण्यात आली आहेत. रोहित शर्मा शेवटचे डोमेस्टिक क्रिकेट कधी खेळला होता? तुम्हाला माहिती नसेल तर या लेखातुन घ्या जाणून
रोहित जवळपास 8 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार
जर रोहित शर्माने दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेतला तर तो तब्बल 8 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो अखेरचा 2016 मध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये खेळला होता. अंतिम सामन्यात त्याने इंडिया ब्लूकडून खेळून पहिल्या डावात 30 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने 32 नाबाद धावा केल्या आणि इंडिया ब्लू संघाला 355 धावांनी मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. (हे देखील वाचा: IPL 2025: काय सागतां! मुंबई इंडियन्स या 3 कारणांमुळे रोहित शर्माला ठेवणार कायम, जाणून घ्या काय आहे मोठे कारण)
रोहित गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळला
गौतम गंभीर दुलीप ट्रॉफी 2016 इंडिया ब्लू संघाचे व्यवस्थापन करत होता. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे, तर गौतम गंभीर संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. कर्णधार गंभीरने त्या सामन्याच्या पहिल्या डावात 94 तर दुसऱ्या डावात 32 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माची प्रथम श्रेणी कारकीर्द
रोहित शर्माने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण 120 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 29 शतके आणि 37 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 9123 धावा केल्या आहेत. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रोहित लेग स्पिनही करायचा. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत.