Azmatullah Omarzai (Photo Credit - X)

ICC ODI Rankings all Rounder: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अजमतुल्लाह उमरझाई (Azmatullah Umarzai) आयसीसीच्या एकदिवसीय अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसीने बुधवारी ताज्या क्रमवारी जाहीर केल्या, ज्यामध्ये अझमतुल्लाहने त्याचा सहकारी मोहम्मद नबीला मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला. नबी दुसऱ्या स्थानावर घसरला. आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अजमतुल्लाह उमरझाईने दोन स्थानांनी प्रगती करत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे 296 रेटिंग गुण आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर होता, जो आता 292 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अझमतुल्लाह उमरझाईची कामगिरी

अजमतुल्लाहने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तिन्ही सामने खेळले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने इतिहास रचला. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात 40 पेक्षा जास्त (41) धावा काढणारा आणि 5 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. यानंतर, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही 67 धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात त्याने 1 विकेट घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 3 सामन्यांमध्ये अजमतुल्लाहने एकूण 7 विकेट्स घेतल्या आणि 126 धावा केल्या.

अफगाणिस्तानने इंग्लंडचा केला पराभव 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून मोठा धक्का दिला. यानंतर, त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी होती, त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना जिंकावा लागला. पण पावसामुळे तिसरा सामना रद्द करावा लागला आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला.

विराट कोहलीलाही फायदा झाला

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावांची खेळी केल्यानंतर विराट कोहलीलाही रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. तो एका स्थानाने पुढे सरकला आहे आणि चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. विराटचे 747 रेटिंग गुण आहेत. शुभमन गिल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, त्याचे 791 रेटिंग पॉइंट्स आहेत.