भारताचे महान धावपूट मिल्खा सिंह (Milkha Singh) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांचे सुपुत्र उत्कृष्ट गोल्फर जीव मिल्खा यांनी माहिती दिली आहे. त्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. त्यानंतर ते चंदीगड येथील आपल्या घरातच क्वारंटाईन (Quarantine) होते. मात्र, त्यांना अशक्तपणाचा त्रास जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिल्खा सिंह यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.
जीव म्हणाले की, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत होता. कालपासून त्यांनी काही खाल्ले नाही. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावा लागले. महत्वाचे म्हणजे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे आम्हाला सुरक्षित वाटले. कारण, रुग्णालयात डॉक्टरांना त्यांच्यावर पाळत ठेवता येईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वाटत आहे. हे देखील वाचा- ICC ने हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवलेल्या Kapil Dev यांच्या कामगिरीचा केला सन्मान; वसिम अक्रम, स्टीफन फ्लेमिंगसह दिग्गजांनी गायले गुणगान (Watch Video)
ट्वीट-
Former athlete Milkha Singh, who had tested COVID19 positive on May 20, admitted to Fortis Hospital Mohali as a precautionary measure, confirms his son
(File pic) pic.twitter.com/uX7mcjRSCF
— ANI (@ANI) May 24, 2021
मिल्खा सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत भारताला अनेक पदक जिंकून दिली आहेत. मिल्खा सिंह यांनी 7 सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक जिंकला आहे. तसेच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आहे.