पोलिसांवर जमावाने हल्ल्याचा हरभजन सिंहने केला विरोध (Photo Credit: Getty/Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतात वेगाने होणारा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं असतानाही लोक नियमांचे उल्लंघन करत असून घराबाहेर पडत असल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने संताप आणि नाराजी व्यक्त केली. हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या एका गटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोलिसांविरुद्ध हिंसक वृत्ती दाखवणाऱ्यांची भज्जीने शाळाच घेतली. भज्जीने ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये काही लोक पोलिसांशी भांडत आहेत आणि त्याच्यावर दगडफेक करीत आहेत. लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी या लोकांना मार्ग अडवून घरातच राहण्याचा सल्ला दिला तेव्हा हे लोक पोलिसांसोबत भांडायला लागले. एवढेच नव्हे तर काही लोकांना दोन पोलिसांचा घेराव करून त्यांना मारतानाही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की मुलगा एका पोलिस कर्मचाऱ्याला मारतो आणि तो रस्त्यावर पडला असतानाही त्याला सतत मारत आहे. (Coronavirus Outbreak: शाहिद अफरीदी ने पाकिस्तानमधील 2000 कुटुंबांना पुरवले रेशन; Netizens ने विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांना फटकारले)

भारतीय गोलंदाजाने ट्विटसह लिहिले की, “पोलिसांविषयीचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. हे विसरू नका की आपले आयुष्य वाचवण्यासाठी ते त्यांचे जीवन पणाला लावत आहेत. त्यांचीही कुटुंबे आहेत, पण ते राष्ट्रासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत... घरी राहून आपले भविष्य सुधारण्यासाठी आपण स्मार्ट असू शकत नाही? कृपया समजुतदारपणा दाखवा."

भारतीय पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, 12 मार्च 24 रोजी रात्रीनंतर संपूर्ण देश 21 दिवस म्हणजे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. आजवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 600 च्या वर पोहचली आहे. भारतात असे 43 लोक आहेत जे उपचारानंतर या संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे.