दक्षिण-पूर्व दिल्ली जिल्हा प्रशासनाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम (Jawaharlal Nehru Stadium) क्वारंटाइन सेंटर म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत डीडीएमएने (दक्षिण-पूर्व) आदेशही जाहीर केले आहेत. सुमारे 1500 लोकांना क्वारंटाइन ठेवण्याची सुविधा येथे विकसित केली जाऊ शकते. डीएम हरलीन कौर (Harleen Kaur) यांनी याबाबत आदेश जारी केला असून या आदेशाची प्रत भारतीय क्रीडा प्राधिकरणालाही पाठविली गेली आहे. सोमवारी आणि मंगळवारी जिल्हा अधिका्यांनीही स्टेडियमला भेट दिली. परंतु, जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील विविध रुग्णालयात अद्याप 300 बेड रिक्त आहेत. दिल्ली सरकारच्या विनंतीनंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) कोविड-19 (COVID-19) रुग्णांसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये क्वारंटाइन सेंटर उभारण्याची मान्यता दिली. ("एकत्र या आणि कठीण परिस्थितीवर मात करा", COVID-19 च्या पार्श्वभूमीवर सुनील छेत्री ने केले महत्वपूर्ण आवाहन)
“नेहरू स्टेडियमसाठी दिल्ली सरकारने आमच्याकडे अधिकृतपणे संपर्क साधला आहे. म्हणून आम्ही ते देत आहोत, आम्ही आधीच आपले सोनीपत सेंटर सोपवले आहे. पटियाला मधील एसएआय प्रशिक्षण केंद्र (एसटीसी) देखील 120 बेडचे क्वारंटाइन ठेवण्याचे केंद्र म्हणून तयार करण्यात आले आहे. एसटीसी एनआयएस पटियालाबाहेरील आहे जिथे आमचे एलिट ऍथलेट्स राहून प्रशिक्षण करतात, असे साईच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले. दरम्यान, भारतात कोविड-19 रुग्णांची संख्या 1,251 च्या वर पोहचली आहे. यात 99 लोकांना डिस्चार्ज किंवा अत्यंत संक्रामक श्वसन आजाराने बरे झालेले आहेत. सोमवारपर्यंत राजधानी दिल्लीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण 97 पर्यंत पोहोचले आहे. त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
Orders issued for utilizing the building of Jawaharlal Nehru (JLN) Stadium complex, as a #COVID19 quarantine facility: Harleen Kaur, Chairperson, DDMA (South-East) pic.twitter.com/CvZJqA1KT5
— ANI (@ANI) March 30, 2020
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत (पीएम-केअर) निधी तयार केला आणि सर्व देशवासीयांना या कठीण स्थितीत पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन केले. कोरोना व्हायरसविरूद्ध लढण्यात देशाला मदत करण्यासाठी अनेक एथलीट्स पुढे आले आहेत आणि मदत जाहीर केली.