ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल राजकारणाच्या वाटेवर, लवकरच भाजप प्रवेश करण्याची शक्यता

बॅडमिंटन कोर्टावर उत्तम कामगिरी केल्यानंतर आता बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल राजकारणात पाऊल ठेवणार आहे.बॅडमिंटनपटू सायना काही वेळातच भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) सामील होणार आहे. सायना भाजपा मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होईल अnt-the-chair-slipped-and-lost-balance-see-what-happened-next-536411.html" title="Viral Video: तरुणीला स्टंट करणं पडलं महागात, खुर्ची सरकली आणि तोल गेला, पाहा पुढे काय झाले">Viral Video: तरुणीला स्टंट करणं पडलं महागात, खुर्ची सरकली आणि तोल गेला, पाहा पुढे काय झाले

Close
Search

ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल राजकारणाच्या वाटेवर, लवकरच भाजप प्रवेश करण्याची शक्यता

बॅडमिंटन कोर्टावर उत्तम कामगिरी केल्यानंतर आता बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल राजकारणात पाऊल ठेवणार आहे.बॅडमिंटनपटू सायना काही वेळातच भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) सामील होणार आहे. सायना भाजपा मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होईल असे मानले जात आहे.

क्रीडा टीम लेटेस्टली|
ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल राजकारणाच्या वाटेवर, लवकरच भाजप प्रवेश करण्याची शक्यता
सायना नेहवाल (Photo Credit: AP/PTI)

बॅडमिंटन कोर्टावर उत्तम कामगिरी केल्यानंतर आता बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) राजकारणात पाऊल ठेवणार आहे.बॅडमिंटनपटू सायना काही वेळातच भारतीय जनता पार्टीमध्ये (Bhartiya Janta Party) सामील होणार आहे. सायना भाजपा मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होईल असे मानले जात आहे. याआधी बरेच प्रसिद्ध खेळाडू भाजपमध्ये सामील झाले आहेत, ज्यात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, कुस्तीगीर बबिता फोगट, योगेश्वर दुत्त यांचा समावेश आहे. हरियाणामध्ये जन्मलेली 29 वर्षीय सायना भाजपासाठी मोठा चेहरा म्हणून काम करू शकते. बॅडमिंटन स्टार सायनाच्या नावावर 24 आंतरराष्ट्रीय पदके आहेत. सन 2009 साली सायना दुसर्‍या क्रमांकावर राहिली होती, तर 2015  तिने नंबरचा मुकुटही परिधान केला आहे. ही कामगिरी करणारी सायना ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. सायनाकडे 22 सुपर सिरीज आणि ग्रँड प्रिक्स जेतेपद आहेत. याव्यतिरिक्त, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.

क्रिकेटर गंभीरनंतर अलिकडच्या वर्षांत ती भाजपमध्ये दाखल होणारी दुसरी मोठी खेळाडू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि पूर्व दिल्लीमधून भाजपने त्याला उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्याने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या आधी सायना भाजपमध्ये प्रवेश करणे ही पक्षासाठी मोठी बाब ठरणार आहे. सूत्रांनुसार सायना दिल्ली निवडणुकीत प्रचार करण्यासाठी भाजपसाठी मैदानात उतरू शकते.

29 वर्षीय सायनाला 2016 मध्ये देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर सायनाला भारताचा सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change