IND vs ZIM ODI: टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर, जाणून घ्या दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी
IND vs ZIM (PC - PTI)

टीम इंडिया झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर आहे. येथे भारतीय संघ केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळणार आहे. यासाठी भारताने अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. झिम्बाब्वेमधील भारताचा विक्रम पाहिला तर तो उत्कृष्ट ठरला आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत येथे 19 सामने जिंकले आहेत. फक्त 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यावेळीही भारताचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. झिम्बाब्वेला विजयासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. भारताने झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

यादरम्यान संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर फक्त 4 सामने हरले. टीम इंडिया प्रदीर्घ कालावधीनंतर झिम्बाब्वेमध्ये पोहोचली आहे. भारताने शेवटची वनडे मालिका 2016 मध्ये खेळली होती. यादरम्यान भारताने 3-0 ने विजय मिळवला. भारताने पहिला एकदिवसीय सामना 9 गडी राखून आणि दुसरा एकदिवसीय सामना 8 विकेटने जिंकला. तर तिसरा सामना 10 गडी राखून जिंकला. हेही वाचा Ross Taylor चा खळबळजनक आरोप, Rajasthan Royals च्या मालकाने 3-4 वेळा लगावली होती कानशिलात

भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये 1992 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला होता.  ऑक्टोबरमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने 30 धावांनी विजय मिळवला होता.  यानंतर 1997 मध्ये दोन एकदिवसीय सामने खेळले गेले. यामध्ये भारताला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरा सामना रद्द झाला. भारत विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्टला खेळण्यात येणार आहे. तर दुसरा सामना 20 ऑगस्टला होईल. तिसरा सामना 22 ऑगस्टला खेळवण्यात येईल.