टोकियो पॅरालिम्पिक 2020 (Photo Credit: PTI)

भारतीय तिरंदाज राकेश कुमारने (Archer Rakesh Kumar) टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) गेम्सच्या वैयक्तिक प्रकारानंतर मिश्र सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व (semifinals) फेरीत प्रवेश केला आहे. ज्योती बलियानसह (Jyoti Baliyan) त्याच्या जोडीने थायलंडच्या जोडीला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना तुर्की विरूद्ध आज दुपारी 2:40 वाजता होईल. राकेश कुमार या खेळांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. राकेश कुमारने पॅरालिम्पिक गेम्सच्या पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी चमकदार कामगिरी केली. तर श्याम सुंदर स्वामी दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला. पात्रता फेरीत 720 पैकी 699 गुण मिळवणाऱ्या 36 वर्षीय राकेशने शनिवारी हाँगकाँगच्या का चुएन एंगईचा 13 गुणांनी पराभव केला. या वर्षी दुबईत सातव्या पॅरा आर्चरी वर्ल्ड रँकिंग स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या कुमारने 150 पैकी 144 गुण मिळवले.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दोन्ही संघ पहिल्या फेरीत बरोबरीत होते. यानंतर थायलंडच्या जोडीने दुसऱ्या फेरीत विजय मिळवत ही फेरी 37-36 अशी जिंकली.  तिसऱ्या फेरीत भारताने 38-36 अशी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत थायलंडचा संघ खूप दबावाखाली दिसला आणि त्याला फक्त 33 गुण मिळू शकले. दुसरीकडे, भारतीय जोडीने 37 गुण मिळवत फेरी जिंकली. थायलंड जोडीने केवळ 10 परिपूर्ण गुण मिळवले. त्याचवेळी ज्योती आणि राकेशने हा पराक्रम दोनदा केला.

येथे सुरू असलेल्या टोकियो पॅरालिम्पिकमधील महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड ओपन आर्चरी स्पर्धेत भारताच्या ज्योती बालियानच्या मोहिमेचा पराभव झाला. 1/16 एलिमिनेशन फेरीत ज्योती आयर्लंडच्या कॅरी लुसी लिओनार्डकडून पराभूत झाली.  671 गुणांसह रँकिंग फेरीत 15 व्या क्रमांकावर असलेल्या ज्योतीला एलिमिनेशन फेरीत लुसीकडून 137-141 असा पराभव पत्करावा लागला. ज्योतीने पहिल्या फेरीत आठ, 10 आणि नऊसह 27 गुण घेतले पण तिच्या प्रतिस्पर्ध्याने 26 गुण घेतले.  ज्योतीने दुसऱ्या फेरीत 25 गुण मिळवले, तर लुसीने 29 गुण मिळवले.