Photo Credit - X

Afghanistan Qualify for Semifinal: अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये जात इतिहास रचला आहे. बांगलादेशचा 8 धावांनी पराभव करत अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे. अफगाणिस्तानच्या सेमी फायनलमध्ये पोहोचल्याने बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नवीन उल हकने 18व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशला ऑल आऊट केलं. त्यामुळे त्याचा या सामन्यातील विजयात मोठा वाटा मानला जात आहे. अफगाणिस्तानाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 115 धावा केल्या. बांगलादेशचा संघ 20 षटकांत 116 धावा करताना अयशस्वी ठरला. सततच्या पावसाने या सामन्यात मोठा व्यत्यय आणला आणि अखेरीस सामन्याचे एक षटकही कमी केले. (हेही वाचा: India Beat Australia: भारताचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे 5 खेळाडू ठरले विजयाचे हिरो)

पोस्ट पहा-

11.4षटकांनंतर पाऊल पडल्याने डीएलएसनुसार अफगाणिस्तानचा संघ पुढे होता. त्यानंतर षटक कमी करण्यात आले आणि लक्ष्य 114 धावांचे करण्यात आले. पण यानंतरही संघाच्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला.

बांगलादेशकडे अफगाणिस्तानने दिलेल्या 116धावा 12.1 षटकांत पूर्ण करत सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी होती. अफगाणिस्तानने अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत आणि झटपट विकेट्स घेत बांगलादेशवर दबाव टाकला. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी अटीतटीची लढत पहायला मिळाली.