आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचे (Team India) माजी क्रिकेटर आणि सध्या भाष्यकार आकाश चोपडा (Aakash Chopra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि मजेदार व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करतात. भारतात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे आणि अशा स्थितीत चोपडा यांनी फॉलोअर्सचे मनोरंजन करण्यासाठी एक हास्यास्पद व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारत 21 दिवसांसाठी बंद आहे. अशा परिस्थितीत खेळाडू आणि प्रत्येक व्यक्ती कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे आणि मजेदार व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करीत आहे. आकाश चोपडा टिकटॉकवरही खूप अ‍ॅक्टिव आहे. यावेळी त्याने आपल्या पत्नीसमवेत टिकटॉक व्हिडिओ बनविला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोपडा यांच्या पत्नी आकाशी (Aakashi) यांनी त्यांना तिच्यावर सूट करणारं एक गाणं विचारलं ज्यावर आकाश विचारात पडले.

व्हिडिओच्या सुरुवातीला आकाश यांची पत्नी आकाशी त्यांना विचारते, "असं कोणतं गाणं आहे जे मला सूट होतं?" यावर चोपडा विचारात पडले आणि त्यांच्या मानत एकच गाणं चालतं-तुने मेरी जिंदगी खराब की है". नंतर चोपडा यांनी आपल्या पत्नीस माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीवर आधारित बनलेला चित्रपट 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' यातील एक रोमँटिक गाणं आपल्या पत्नीसाठी गायले. सध्याच्या या लॉकडाउन स्थितीत आकाश आणि त्यांची पत्नी आकाशी यांचा हा व्हिडिओ नक्की तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. पाहा:

आकाश यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. यापूर्वी आकाश यांनी पत्नीसोबतच आणखी एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात त्यांच्या क्रिकेटने परेशान होत त्यांची पत्नी घर सोडून जात असल्याचं म्हणते. यावर आकाश म्हणतात, "पहिल्यांदा पावलांचा योग्य वापर."