National Payments Corporation of India कडून UPI Transaction IDs मध्ये आता स्पेशल कॅरेटर्सचा समावेश नसेल. हा नवा नियम 1 फेब्रुवारी पासून लागू होणार आहे. हा निर्णय सर्व व्यवहार technical specifications चे पालन करतात याची खात्री करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मची एकूण सुरक्षितता सुधारण्यासाठी प्रयत्नांचा एक भाग आहे.
NPCI ने 9 जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, नवीन नियमानुसार सर्व UPI ट्रान्झॅक्शन आयडी कठोरपणे अल्फान्यूमेरिक असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की @, !, किंवा # सारखे विशेष वर्ण असलेला कोणताही व्यवहार आयडी सिस्टमद्वारे आपोआप नाकारला जाईल. NPCI ने म्हटले आहे की UPI इकोसिस्टममधील बहुतेक सहभागींनी आधीच तांत्रिक मानकांचे पालन केले आहे, परंतु काहींनी non-compliant formats वापरणे सुरू ठेवले आहे. यावर उपाय म्हणून 1 फेब्रुवारी 2025 पासून नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनंदिन व्यवहारांसाठी UPI वर अवलंबून असणाऱ्या लाखो भारतीयांसाठी या बदलाचे काही परिणाम होऊ शकतात. एखाद्या यूजरने विशिष्ट वर्णांसह व्यवहार आयडी तयार करणाऱ्या ॲपद्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न केल्यास, व्यवहार पूर्ण होणार नाही.
Transaction Failure, टाळण्यासाठी यूजर्सना काही सोप्पी पावले उचलण्याचा सल्ला देतात. प्रथम, त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे UPI ॲप latest version अपडेट केले आहेत. App update मध्ये सहसा compliance features आणि security improvements,समाविष्ट असतात. त्यामुळे ॲप up-to-date ठेवणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, यूजर्स NPCI च्या नवीन नियमांचे पालन करण्यासंबंधी कोणत्याही सूचनांसाठी त्यांच्या ॲपच्या सेटिंग्ज किंवा announcements तपासू शकतात.