Afghanistan (twitter)

बांग्लादेश (Bangladesh) येथे सुरु असलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात अफगानिस्तानच्या (Afghanistan) संघाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. त्रिकोणीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात अफगानिस्तानच्या संघाने झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) संघावर 28 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयात मोहम्मद नबी (Mohammad Nabi) आणि नजीबुल्लाह (Najibullah Zardan) यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. महत्वाचे म्हणजे ,या सामन्यात अफगानिस्तानच्या संघाने सलग 7 चेंडूत 7 षटकार ठोकले आहेत, तरीदेखील भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) याचे 6 षटकारांचे रेकार्ड कायम राहिले आहे.

अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात शनिवारी रोमांचक सामना पाहायला मिळाला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात अफगानिस्तानच्या संघाकडून मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह फलंदाजी करत असताना त्यांनी सलग 7 षटकार ठोकल्याचा रेकार्ड केला आहे. तरीदेखील त्यांना भारताचा फलंदाज युवराज सिंहचे रेकार्ड मोडता आले नाही. इनिंगच्या 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या 4 चेंडूत मोहम्मद नबीने सलग 4 षटकार मारले होते. त्यानंतर 18 व्या ओव्हरमध्ये नजीबुल्लाह याने पहिल्या 3 चेंडूत सलग 3 षटकार मारले आहेत. महत्वाचे म्हणजे भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंह सिंह याने स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकल्याची कामगिरी बजावली होती. यामुळे युवराज सिंह याचे षटकाराचे रेकार्ड कायम राहिले आहे. हे देखील वाचा- IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहित शर्मा याला 'हा' खास रेकॉर्ड करण्याची संधी

अफगानिस्तान विरोधी झिम्बाब्वे यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे 8 सामने झाले आहेत. परंतु, एकाही सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवता आला नाही. तसेच या विजयासह अफगानिस्तानच्या संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ११ वा सामना जिंकला आहे. या सामन्यात अफगानिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या संघासमोर 198 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, झिम्बाब्वेच्या संघाला केवळ 169 धावा करता आल्या. यामुळे अफगानिस्ताच्या संघाला 28 धावांनी विजय मिळवता आला.