PAK vs SL: आणीबाणीच्या काळातही श्रीलंकेत पाकिस्तान संघाचे जल्लोषात स्वागत, पहा व्हिडिओ
Pakistan team

श्रीलंकेत आणीबाणीच्या (Sri Lanka Emergency) स्थितीतही पाकिस्तानचा संघ (Pakistan team) कसोटी मालिका खेळणार आहे. गुरुवारी हा संघ कोलंबोहून गाले येथे पोहोचला. गालेमध्येही पाक संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. पाकिस्तानी संघ गाले येथील हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांचे पारंपरिक श्रीलंकन ​​शैलीत स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गाले विमानतळ सोडल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू बसमधून हॉटेलकडे निघाले आहेत. हॉटेलमध्ये जांभळ्या रंगाची फुले देऊन त्यांचे स्वागत केले जाते. यानंतर पारंपारिक नृत्य सादर करणारा समूह या खेळाडूंचे स्वागत करताना दिसत आहे.

यादरम्यान कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानही हॉटेलमध्ये दिवे लावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेत सध्या आणीबाणीची स्थिती आहे. येथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही देश सोडला आहे. या सगळ्यात पाकिस्तानचा श्रीलंका दौरा धोक्यात आला होता पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मन वळवण्यात श्रीलंका क्रिकेटला यश आले. आता 16 जुलैपासून दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, अझहर अली, फहीम अश्रफ, फवाद आलम, हरिस रौफ, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सर्फराज अहमद (wk), सौद शकील, शाहीन आफ्रिदी, शान मसूद आणि यासिर शाह.