इक्वेडोरहून स्पेनला जाणाऱ्या विमानात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे तमारा नावाच्या महिलेने फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलेला तिच्या गर्भधारणेबद्दल अजिबात कल्पना नव्हती. केएलएम रॉयल डच एअरलाइन्सच्या फ्लाइट KL755 मध्ये ही घटना घडली. क्वाडोरहून अॅमस्टरडॅम शिफोल, नेदरलँड्सच्या दिशेने प्रवास करणाऱ्या या तरुणीने अनपेक्षितपणे बाळाला जन्म दिला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेदरलँडमध्ये उतरण्याच्या काही तासांपूर्वी महिलेच्या पोटात दुखू लागले आणि ती शौचालयात गेली. तेथे तिने तिच्या मुलाला जन्म दिला. स्पार्न्स गस्थुईस हॉस्पिटलने सांगितले की, तिला ती गर्भवती असल्याची कल्पना नव्हती. केएलएम एअरलाइनने सांगितले की, बाळ आणि महिला दोघेही निरोगी आहेत. ऑस्ट्रियातील दोन डॉक्टर आणि एक परिचारिका विमानात होते, त्यांनी तिला मदत केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)