मानव जगभरात अनेक प्रकारचे प्राणी पाळतात. कुत्री (Dog) आणि मांजर (Cat) सामान्यतः माणसांच्या जवळ दिसतात. याशिवाय गाई, म्हैस, गाढव, हत्ती, घोडे, बकरी यांसारखे प्राणी पशुपालनासाठी पाळले जातात. पण काही माणसे असे ही आहेत जे हिंस्त्र पशूंना देखील पाळल्याचे दिसते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. या व्हिडिओमध्ये  एक माणूस त्याच्या तीन पाळीव चित्तांसोबत (Man Sleeps With Cheetah) दिसत आहे. ज्या दरम्यान एक चित्ता त्या व्यक्तीला मिठी मारून झोपलेला दिसतो. नंतर दोन्ही चित्ते त्या व्यक्तीच्या जवळ येऊन झोपतात.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)