रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील ऊर्जा संकट अधिक गडद झाले आहे. प्रगत देश ब्रिटनलाही महागाईचा तडाखा बसला आहे. ब्रिटनमध्ये अनेक लोक आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. शहरातील लोकांच्या खाण्यापिण्याची यादी आता मर्यादित झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या बर्नलीला सर्वाधिक फटका बसला आहे, तिथे लोक ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी दुपारचे जेवण टाळत आहेत. दुसरीकडे बातमी आहे की, महागाई वाढल्याने लोकांना प्राण्यांचे अन्न खाऊन गुजराण करावी लागत आहे आणि लोक चक्क मेणबत्त्यांचा वापर करून जेवण गरम करण्याचा प्रयत्न करत आहेत ब्रिटनमधील महागाईने चाळीस वर्षांतील उच्चांक गाठला आहे.

अन्न आणि अल्कोहोल नसलेल्या पेयांच्या किंमती वर्षभरात ऑक्टोबरपर्यंत 16.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 1977 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या महिन्यात खाद्यपदार्थांच्या किंमती पुन्हा वाढल्या. किराणा मालाच्या किमती गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत 12 टक्के जास्त आहेत. 2005 मध्ये ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियम (BRC) च्या नोंदी सुरू झाल्यापासूनचा, अन्नधान्य चलनवाढीचा सर्वात जास्त दर आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त लोक फूडबँकवर अवलंबून आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)