अमेरिकेच्या टेक्सासमधून एक धक्कादायक घटना समोर अली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या गाडीवरील बर्फ पुसण्यासाठी वायपर म्हणून चक्क 3 महिन्यांच्या बाळाचा वापर केला आहे. हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला असून, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती 3 महिन्यांच्या बाळाचा वापर करून त्याच्या गाडीवरील बर्फ काढत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राज्याला दुर्मिळ हिमवादळाचा तडाखा बसल्यानंतर हा व्हिडिओ ह्यूस्टनपासून 90 मैल अंतरावर असलेल्या पोर्ट आर्थरमध्ये घेण्यात आला होता. अहवालानुसार व्हिडीओमधील व्यक्ती बाळाचा 25 वर्षीय बाप असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याच्यावर प्रतिक्रिया देत या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलीस आणि बाल संरक्षण सेवांकडून या व्यक्तीची चौकशी सुरू असून, त्याच्यावर अजून आरोप ठेवण्यात आलेला नाही. पुढील आठवड्यापर्यंत त्याला जेफरसन काउंटी जिल्हा मुखत्यार कार्यालयाकडून अटक वॉरंट मिळू शकेल. (हेही वाचा: Hoshiarpur Shocker: शाळेच्या मुख्याध्यापकाची लहान मुलाला बेदम मारहाण; विचलित करणारी दृश्य आली समोर)

कारवरील बर्फ पुसण्यासाठी वायपर म्हणून केला 3 महिन्यांच्या बाळाचा वापर-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)