Mia Khalifa Lost Job: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढत असताना हमासने इस्रायलवर हल्ले सुरू केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातचं आता अॅडल्ट स्टार मिया खलिफाने पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला. मियाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात, आणि इतिहास हे काळानुसार दाखवेल.' मियाच्या या ट्विटने रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची कंपनी यूएस आणि युरोपमध्ये मशरूम होम ग्रोथ किट्सचे उत्पादन आणि विक्री करते. या वर्षाच्या सुरुवातीला, मियाला या कंपनीत नोकरी मिळाली होती. ती या कंपनीचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणार होती. मात्र, आता कंपनीच्या CEO ने जाहीरपणे मिया खलिफाला नोकरीवरून काढून टाकलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)