पाकिस्तान आजवरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी दयनीय आहे की कधी पीठ-डाळीसाठी तर कधी पेट्रोल-डिझेलसाठी लोकांमध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या येत आहेत. या मालिकेत आणखी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील महागाईचा सामना करण्यासाठी सबवेने आपल्या सँडविचचा आकार कमी केला आहे. सबवेने पहिले ३ इंच मिनी सँडविच लाँच केले.

सबवेने पाकिस्तानमधील सँडविचचा आकार 3 इंचापर्यंत कमी केला आहे. त्याचे कारण म्हणजे सँडविच लहान असल्याने त्याची किंमत कमी असेल आणि लोकांना ते कमी किमतीत खरेदी करता येईल. सबवेने सँडविचची मिनी व्हर्जन लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)