Typhoon Khanun: जपानमध्ये चक्रीवादळ खानूनच्या प्रभावामुळे जवळपास 264 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जपान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोमवार आणि मंगळवारी ओकिनावा आणि अमामी या नैऋत्येकडील प्रदेशांना चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. जपान एअरलाइन्स (जेएएल) ने आज वादळ जवळ आल्याने 67 उड्डाणे रद्द केली, तर ऑल निप्पॉन एअरवेज (एएनए) ने आज 73 आणि मंगळवारी 124 उड्डाणे रद्द केली. जपानी अधिकाऱ्यांनी ओकिनावा आणि अमामी रहिवाशांना चेतावणी दिली आहे की चक्रीवादळ खानूनमुळे उंच लाटा, भूस्खलन आणि पूर येण्याची शक्यता आहे.
#Japan Meteorological Agency (JMA) said #Khanun, a large and powerful typhoon, is expected to approach the country's southwestern regions of #Okinawa and #Amami from Monday through Tuesday. pic.twitter.com/RRKP3itn6u
— IANS (@ians_india) July 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)