गेल्या दीड वर्षांपूर्वी जगाने ‘कोरोना व्हायरस’ नावाची मोठी महामारी पाहिली. या महामारीमध्ये लाखो लोकांना आपला जीव गमावला लागला. आता जग पुन्हा पूर्वपदावर येत असताना काही ठिकाणी पुन्हा या महामारीने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. सिंगापूरमध्ये आणखी एक कोविड-19 येऊ घातली आहे. इथे दैनिक कोरोना प्रकरणांची संख्या 2000 पर्यंत गेली आहे. येणाऱ्या आठवड्यात इथे आणखी लोक आजारी पडण्याची आणि रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य मंत्री ओंग ये कुंग (Ong Ye Kung) यांनी शुक्रवारी दिला. ओंग म्हणाले की अंदाजे दैनिक प्रकरणे तीन आठवड्यांपूर्वी सुमारे 1,000 वरून गेल्या दोन आठवड्यांत 2,000 पर्यंत वाढली आहेत.

मात्र, मार्च ते एप्रिल या कालावधीत आलेल्या शेवटच्या लाटेप्रमाणे सध्या तरी सामाजिक निर्बंध लादण्याची कोणतीही योजना नाही, असेही त्यांनी सांगितले. एप्रिलमधील प्रकरणांच्या पिकदरम्यान, संसर्गाची संख्या दिवसाला सुमारे 4,000 प्रकरणे झाली. (हेही वाचा: 'Mystery' Illness Outbreak in Kenya: केनियातील विद्यार्थ्यांना गूढ आजारांची लागण, अनेकांमध्ये अर्धांगवायूची लक्षणे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)