सिंगापूरच्या कॅसिनो मरीना बे मधून मृत्यूचे एक आश्चर्यकारक प्रकान समोर आले आहे. या ठिकाणी 4 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 33 कोटी रुपये जिंकल्यानंतर विजेत्याला उत्साहामुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तेथे उपस्थित असलेले इतर लोकही चक्रावून गेले. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर व्हायरल होत आहे. कॅसिनोमध्ये जिंकलेली रक्कम ऐकून व्यक्तीला प्रचंड आनंद झाला व त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी आसपासच्या लोकांनी त्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही.

सिंगापूरचा मरीना बे कॅसिनो हा जगातील सर्वात प्रसिद्ध कॅसिनो पैकी एक आहे. या ठिकाणी विविध इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी चार स्तरांवर गेमिंग फ्लोअर स्पेस आणि 2,300 स्लॉट मशीन्सवर गेम खेळण्याचे पर्याय आहेत. या ठिकाणी 500 गेमिंग टेबल्स आणि 1,600 जॅकपॉट मशीन्स आहेत. (हेही वाचा: Viral Video: उड्डाणा दरम्यान विमानाचा दरवाजा उघडला, महिला पायलट थोडक्यात बचावली)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)