पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यासोबत नागरिकांकडून बुधवारी रात्री असभ्य वर्तन घडले. प्राप्त माहितीनुसार लाहोरमध्ये लोकांनी त्यांची कोंडी केली. पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्न व इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहालया मिळते की, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनाची गाडी अडवून लोक जोरदार गोंधळ घालत आहेत. व्हिडिओमध्ये शहबाज शरीफ त्यांच्या कारमध्ये दिसतात. त्यांचा ताफाही नागरिकांनी अडवल्याचे पाहायला मिळते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)