काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. सध्या ते यूएस येथे आहेत. यूएसमध्ये ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचे तेथील नागरिकांकडून जोरदार स्वागत होते आहे. दरम्यान, न्यू यॉर्क येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावताना शिख समूदयाच्या एका गटाने राहुल गांधी 'go back' चे नारे दिले. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या लोकांची संख्या अगदीच अदखलपात्र होती. मात्र, राहुल गांधी यांच्या स्वागतासठी आलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यूएस येथे ते भारतीय डायस्पोराला संबोधीत करतील.

व्हिडिओ | एका शीख गटाच्या सदस्यांनी राहुल गांधींना “परत जाण्यास” सांगितले तर इतरांनी त्यांचे स्वागत मोठ्या मनाने न्यूयॉर्क, यूएसए येथे काँग्रेस नेत्याच्या भारतीय डायस्पोराला संबोधित करण्यापूर्वी केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)