तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मॅडबौली यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींचा हा दोन दिवसांचा दौरा आहे. ते इजिप्तच्या पंतप्रधानांसोबत गोलमेज बैठक घेतील आणि राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचीही भेट घेतील. कैरो येथील हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींचे भारतीय समुदायाच्या सदस्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. कैरोमध्ये पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतीय समुदायाचे लोक सर्व खूप उत्सुक आहोत. आज सुमारे 300-350 लोकांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. (हेही वाचा: PM Modi Meets Joe Biden, Jill Biden: PM नरेंद्र मोदी आणि जो बिडेन, फर्स्ट लेडी जिल यांच्यात भेट; ग्रीन डायमंड, Sandalwood Box आणि उपनिषदांची प्रत भेट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)