एका ऑस्ट्रेलियन ट्रान्सजेंडर महिलेने केमिकल टाकून आपले लिंग जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लिंग भाजल्यानंतर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागेल आणि डॉक्टर आपले लिंग काढून टाकतील म्हणून तिने हे कृत्य केले. याद्वारे या महिलेला आपले स्त्री बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करायचे होते. युरोलॉजी केस रिपोर्ट्स या वैद्यकीय जर्नलमध्ये नुकतेच याबाबत तपशीलवार एक केस स्टडी प्रकाशित झाली आहे. अहवालानुसार, ही 57 वर्षीय अज्ञात ट्रान्स महिला पुरुष म्हणून जन्माला आली होती, परंतु तिला स्त्री बनायचे होते. लिंग बदल ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी सांगितलेली वैद्यकीय फी तिला परवडण्यासारखी नव्हती, त्यामुळे तिने केमिकल टाकून आपले लिंग जाळले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला ट्रान्स-सर्जरी तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लिंगबदल ऑपरेशन हे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विम्याद्वारे संरक्षित नाही, परिणामी, रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होऊ शकतात. (हेही वाचा: नियोजीत वधू गर्भवती होण्यासाठी तुरुंगातून सँडविच बॅगमध्ये पाठवले शुक्राणू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)