पाकिस्तान पोलिसांनी (Pakistan) एका व्यक्तीला अटक केली आहे ज्याने काही मुलांची हत्या तर केलीच पण त्यांचे मांसही खाल्ले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मुझफ्फरगड येथून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने अवघ्या पाच दिवसांपूर्वी तीन मुलांचे अपहरण केले होते. आरोपींनी यातील दोन मुलांचा निर्दयीपणे जीव घेतला. तसेच त्या मुलांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतर अली हसन या 7 वर्षीय मुलाचा जीव वाचला. मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मुलांचे वयही खूपच लहान होते. अली हसनने सांगितले की, त्या पागल व्यक्तीने आधी अब्दुल्ला आणि त्याची बहीण हफसा यांची हत्या केली आणि नंतर त्यांचे मांस शिजवून खाल्ले. मृत्यू झालेल्या अब्दुल्ला तीन वर्षांचा तर त्याची बहीण दीड वर्षांची होती. एवढ्या लहान मुलांच्या हत्येमागे कोणत्या वेडेपणामुळे कारणीभूत ठरले हे अद्याप समजू शकलेले नाही. (हे देखील वाचा: Girl Kills Classmate: चौदा वर्षीय मुलीचा वर्गमित्रांवर गोळीबार; एक ठार, पाच जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)