इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी यांच्या न्यायिक दुरुस्तीच्या योजनेला आव्हान दिल्याबद्दल त्यांच्या संरक्षणमंत्र्यांची अचानक हकालपट्टी केल्यानंतर संतापाचा उत्स्फूर्त उद्रेक पहायला मिळाला. हजारो निदर्शक इस्रायलमधील शहरांमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. तेल अवीव (Tel Aviv) मधील आंदोलकांनी, अनेकांनी निळे आणि पांढरे इस्रायली ध्वज हाती घेत एक मुख्य महामार्ग रोखून धरला. तसेच जेरुसलेममधील नेतान्याहूच्या खाजगी घराबाहेर जमलेल्या निदर्शकांशी पोलिसांसोबत झटापट देखील झाली. नेतन्याहू यांनी न्यायिक प्रणालीत मोठे बदलाव करण्याची योजना आखली असून त्याला सरक्षणमंत्री योआव गैलेंटने विरोध दर्शवला होता.
पहा व्हिडिओ -
Massive protests in Tel Aviv after Netanyahu fired his defense minister pic.twitter.com/2yZOs7MAc1
— BNO News Live (@BNODesk) March 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)