Massive Fire at Sweden’ Water Park: स्वीडनमध्ये देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन उद्यानापैकी एक समजल्या जाणाऱ्या गोटेनबर्ग येथील लिसेबर्ग मनोरंजन उद्यानात मोठी आग लागल्याची घटना समोर येत आहे. सोमवारी, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. लिसेबर्ग येथील ओशियाना वॉटरवर्ल्डच्या राईडमध्ये हा स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठू लागले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार ही आग इतकी मोठी आहे की, अग्निशमन विभागाने चेतावणी दिली की ज्वाला जवळपासच्या घरांमध्ये पसरू शकतात. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, कोणतीही दुखापत झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. ओशियाना या उन्हाळ्यात उघडण्याचे नियोजित होते. स्वीडिश वृत्तसंस्था टीटीने सांगितले की, ते तयार करण्यासाठी 1.2 अब्ज क्रोनर ($10.6 दशलक्ष) खर्च आला आहे. (हेही वाचा: Putting 1 Month Baby In Oven: जन्मदात्या आईचा पराक्रम! मिसूरीमध्ये 1 महिन्याच्या बाळाला ठेवलं ओव्हनमध्ये, दुर्दैवाने अंत,आरोपीला अटक)
पहा व्हिडिओ-
Terrifying moment new water ride EXPLODES in fireball at Swedish amusement park.
🎥 Anna Gyllenhammar
A Swedish amusement park was engulfed in a terrifying inferno after a new waterpark attraction exploded this morning.
Shocking footage showed the installation at the Oceana… pic.twitter.com/Yc42IS8jko
— Kenvin (@kenvinwhise) February 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)