US Presidential Election 2024: अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी मंगळवारी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी मिळाली. यासह, देशातील प्रमुख राजकीय पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे तिकीट मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-आफ्रिकन महिला ठरल्या. दरम्यान, कमला हॅरिस यांनी मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ (Minnesota Governor Tim Walz) यांना त्यांचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार (VP Running Mate ) म्हणून निवडले आहे. माजी शिक्षक वॉल्झ सध्या मिनेसोटाचे गव्हर्नर म्हणून त्यांची दुसरी टर्म सेवा देत आहेत. ते डेमोक्रॅटिक गव्हर्नर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत कमला हॅरिस यांचा सामना माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणार आहे. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक रंजक बनली आहे.
BREAKING: Kamala Harris names Minnesota Governor Tim Walz as running mate - CNN pic.twitter.com/hGnP0LwS0S
— BNO News (@BNONews) August 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)