ॲमेझॉनचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि त्यांची जोडीदार लॉरेन सांचेझ या ख्रिसमसमध्ये लग्न करत आहेत. अज्ञात स्रोताच्या हवाल्याने 'द सन'च्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. जेफ आणि लॉरेनचे जवळचे मित्र आणि हाय-प्रोफाइल पाहुणे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, जेफ बेझोस आणि त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि आता मंगेतर लॉरेन सांचेझ या ख्रिसमसमध्ये अस्पेन (कोलोरॅडो) येथे लग्न करणार आहेत. या जोडप्याला अनेकदा अस्पेनमध्ये पाहिले गेले आणि त्यामुळेच हां शहरात त्यांचे बहुप्रतिक्षित लग्न होणार असल्याचे समोर आले.
60 वर्षीय जेफ बेझोस सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 235 अब्ज डॉलर्स आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बेझोसच्या संपत्तीत यावर्षी 57.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर 54 वर्षीय लॉरेन सांचेझ एक मीडिया व्यक्तिमत्व होती, जिने द व्ह्यू, केटीटीव्ही आणि फॉक्स 11 सारख्या अनेक न्यूज चॅनेलसाठी रिपोर्टर आणि न्यूज अँकर म्हणून काम केले आहे. जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांनी संबंध 2018 मध्ये सार्वजनिक झाले, त्यावेळी दोघेही विवाहित होते. (हेही वाचा: Japan Population Crisis: 'महिलांनी 25 वर्षांपर्यंत करावे लग्न आणि 30 व्या वर्षी काढून टाकावे गर्भाशय'; जपानमधील लोकसंख्या संकटावर नेते Naoki Hyakuta यांचा अजब सल्ला)
Jeff Bezos and Lauren Sanchez Wedding:
Amazon founder Jeff Bezos and his fiancée Lauren Sanchez are planning a winter wonderland wedding in Aspen, Colorado #JeffBezos #LaurenSanchez #Amazon #Weddinghttps://t.co/Cptu2j4g7U pic.twitter.com/7RSyIXKcXh
— News18 (@CNNnews18) November 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)