तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलच्या एका व्यस्त पादचारी मार्गावर बॉम्बस्फोट झाला असून, त्यात अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (13 नोव्हेंबर) इस्तंबूलमध्ये रविवारी मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले असताना हा स्फोट झाला. तुर्की मीडियाने म्हटले आहे की, शहराच्या तकसिम स्क्वेअरजवळ इस्तिकलाल एव्हेन्यूवर झालेल्या संशयित आत्मघाती बॉम्बस्फोटात अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या कारणाची पुष्टी केलेली नाही.

स्फोटानंतर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, स्फोटानंतर परिसर रिकामा करण्यात आला. हा परिसर शहरातील सर्वात व्यस्त शॉपिंग रस्त्यांपैकी एक आहे. यापूर्वी ISIS च्या हल्ल्यांनी हे शहर लक्ष्य केले गेले आहे. 2017 मध्ये, ओर्तकोय परिसरातील एका नाईट क्लबमध्ये बंदुकधारींनी गोळीबार केल्यानंतर 39 लोक ठार झाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)