Durga Puja at Times Square in NYC: सध्या सर्वत्र नवरात्र आणि दुर्गापूजेची धामधूम सुरु आहे. पश्चिम बंगालसह मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या मोठ-मोठ्या शहरांत बंगाली लोक दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. आता अमेरिकेतील प्रसिद्ध न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअर येथे पहिल्यांदाच दुर्गापूजेचा सण साजरा झाला. नुकतेच टाइम्स स्क्वेअरवर दुर्गा पूजा पंडाल दिसला. यावेळी या उत्सवामध्ये अनेक भारतीय-अमेरिकन सहभागी झाले होते. याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी एक दुर्गा पूजा पंडाल दिसत आहे, जिथे बरेच लोक या ऐतिहासिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी जमले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन द बंगाली क्लब यूएसए तर्फे करण्यात आले होते. टाइम्स स्क्वेअर येथे पारंपारिक नवमी पूजा आणि दुर्गा स्तोत्रांनी उत्सवाची सुरुवात झाली. (हेही वाचा: Dussehra 2024 Rangoli Design: दसर्‍यांचं औचित्य साधत दारात काढा आकर्षक रांगोळ्या आणि करा सणाचं स्वागत)

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच साजरी झाली दुर्गापूजा-

 

View this post on Instagram

 

A post shared by RUCHIKA JAIN FIREFLYDO (@fireflydo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)