Dasara| You Tube

Dussehra 2024 Rangoli Design: दसरा 2024 हा एक महत्वाचा भारतीय सण आहे, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. यंदा 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा आहे. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात रावणाच्या पुतळ्याचे दहन करून हा शुभ उत्सव साजरा केला जातो. दसरा हा सण प्रकाश, आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. महान हिंदू पौराणिक कथेनुसार दसरा उत्सव साजरा केला जातो, या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आहे. म्हणून याला विजयादशमी म्हणून ओळखले जाते. महिषासुरावर देवी दुर्गेचा विजय म्हणूनही दसरा ओळखला जातो. नवरात्रीचा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो, ज्यामध्ये देवी दुर्गाने राक्षसाशी युद्ध केले आहे. रावणाचा पराभव करून भगवान राम आपली पत्नी सीतेसह अयोध्येला परतले. त्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी दसऱ्याचा सण उत्साहात, दिवे लावून, रांगोळी काढण्यात आला. अयोध्येत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. या निमित्ताने देशभरात मोठ्या प्रमाणावर जत्रा आणि उत्सव आयोजित केले जातात आणि 10 दिवस पूर्ण उत्साहात साजरे केले जातात.  दिवाळी, हिंदूंचा सर्वात शुभ आणि भव्य सण, दसऱ्याच्या 20 दिवसांनी साजरा केला जातो. दरम्यान, या खास दिनानिमित्त तुम्ही दारासमोर सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकतो. हे देखील वाचा :  Indian Airforce Day 2024 Greetings: भारतीय वायुसेना दिनानिमित्त Images आणि HD Wallpapers च्या माध्यमातून पाठवा खास शुभेच्छा संदेश

दसरा सणानिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन

दसरा सणानिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन

दसरा सणानिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन

दसरा सणानिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन

दसरा सणानिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन

 

उत्सवामागे अनेक पौराणिक कथा आहेत. भारताच्या काही भागांमध्ये, हा दिवस देवी दुर्गाने महिषासुराचा वध केल्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. अशाप्रकारे नवरात्रीमध्ये दुर्गेच्या सर्व नऊ अवतारांची पूजा केली जाते. दक्षिण भारतात, चामुंडेश्वरीने महिषासुर या राक्षसाचा वध केला त्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे.