VIDEO: ब्रिटिश कोलंबियातील रिचमंड येथील रेल्वे पुलाला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुरांचे लोट पसरत आहे. ओक स्ट्रीट पुलाजवळ असेलल्या पुलाला ही आग लागली आहे. घटनास्थळी आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु होते. रिचमंड फायर रेस्क्यूने सांगितले की, आग सुमारे 8.15 फ्रेझर नदीवर लागली तेव्हा अधिकाऱ्यांना सूचना मिळाली. सूचना मिळताच अग्निशमनाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचले. आग कश्यामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. आगीत किती जीवितहानी झाली याचा अंदाज वर्तवला जात आहे.  आगीमुळे धूर पसरले आहे. त्यामुळे नागरिकांवर त्याचा परिमाण होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  (हेही वाचा- पुणे गॅस गळती, सोलापूर फटाका कंपनी आग, जळगाव पेट्रोल पंप आग; या क्षणाच्या ठळक घडामोडी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)