Bangladesh Crisis: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्या लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरने भारतात आल्या व लवकरच त्या लंडनला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने येत आहे. बांगलादेशातील हिंसाचाराच्या घडामोडी पाहता भारतही 'हाय अलर्ट' मोडवर आहे. शेजारील देशात सुरु असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
माहितीनुसार, 13109/13110 (कोलकाता-ढाका-कोलकाता मैत्री एक्सप्रेस) रेल्वे 19 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान रद्द करण्यात आली होती. यासह बंधन एक्सप्रेस, मिताली एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. बांगलादेशातील घडामोडी लक्षात घेऊन सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व युनिट्ससाठी 'हाय अलर्ट' जारी केला आहे. बीएसएफने आपल्या सर्व 'फील्ड कमांडर्स'ना तात्काळ सीमेवर सर्व जवान तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: Bangladesh Protests: पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत आल्या शेख हसीना; आता लंडनला जाणार)
पहा पोस्ट-
Indian Railways had cancelled all train services including Kolkata-Dhaka-Kolkata Maitri Express train to Bangladesh from 19th July till 6th August: Indian Railways
— ANI (@ANI) August 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)