ट्विटर सर्व्हर डाउन आहे. अनेक वापरकर्त्यांना त्यांचे खाते लॉग इन करताना समस्या येत आहेत. Tweetdeck देखील काम करत नाही. वापरकर्ते ट्विट डेकवर लॉग इन करू शकत नाहीत. याशिवाय अनेक यूजर्सनी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सर्व्हरबाबतही तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सनी यूट्यूबमध्ये समस्या असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, आता हळूहळू ही समस्या दूर केली जात आहे. दरम्यान, ट्विटरवर काही लोकांना त्रास होत असल्याचे ट्विटरवर सांगण्यात आले आहे. कंपनीला याबद्दल खेद आहे. ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Twitter may not be working as expected for some of you. Sorry for the trouble. We're aware and working to get this fixed.
— Twitter Support (@TwitterSupport) February 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)