इस्रोने (ISRO) SSLV-D1 पृथ्वी निरीक्षण उपग्रह (Earth Observation Satellite) आणि विद्यार्थ्यांनी तयारकेलेला उपग्रह-आझादी का सॅटेलाईट (AzaadiSAT) यांचं प्रक्षेपण केलं आहे. त्यापैकी SSLV चे पहिले उड्डाण पूर्ण झाले आहे. सर्व टप्पे अपेक्षेप्रमाणे पार पडले आहेत. पण टर्मिनल स्टेज (Terminal Stage) दरम्यान डेटा (Data) गमावला गेला असला तर संबंधित विश्लेषण आम्ही लवकरचं देवू अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. तरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त (Azadi Ka Amrit Mohotsav) भारतीय विद्यार्थ्यांनी आझादी का सॅटेलाईट तयार केला आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र (Satish Dhawan Space Centre), श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)