चंद्रयान 3 चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅन्डिंग झाल्यानंतर विक्रम लॅन्डर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला आहे. हा रोव्हर पुढील 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागाचं परीक्षण करणार आहे. तेथील नमूने गोळा करणार आहे. दरम्यान आजच पंतप्रधान मोदींनी या मोहिमेतील विक्रम लॅन्डर जेथे उतरला तेथील पॉईंटचे नामकरण शिव शक्ती केले आहे. या पॉईंट वर विक्रम लॅन्डर मधून बाहेर पडलेल्या प्रज्ञान रोव्हरचा व्हिडिओ पहिल्यांदाच इस्त्रो कडून जारी करण्यात आला आहे. Chandrayaan 3 Update: विक्रम लॅन्डर उतरलं ते ठिकाण 'शिवशक्ती' तर चंद्रयान 2 पोहचलेल्या ठिकाणाचं नाव 'तिरंगा' - PM Modi यांची घोषणा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)