Chandrayaan 3 ने आता अजून एक मोठा टप्पा पार केला आहे. यामध्ये 17 ऑगस्ट दिवशी प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल हे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. आज इस्त्रोने दिलेल्या माहितीमध्ये  सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती 153x163 एवढ्या कक्षेत फिरत असल्याचं सांगितलं आहे. या चांद्रयानाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सॉफ्ट लॅन्डिंग. चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. त्यामुळे आता सार्‍यांचे लक्ष या मोहिमेत सॉफ्ट लॅन्डिग कडे लागले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)