Sam Altman ला OpenAI च्या सीईओ पदापासून दूर केल्यानंतर आता सीईओ पदाची जबाबदारी पुन्हा त्याच्याकडे देण्याच्या गुंतवणूकदारांच्या मागणीला बोर्डाने नाकारले आहे. दरम्यान आता Emmett Shear कडे CEO पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समोर आलं आहे. Shear कडे यापूर्वी अमेझॉनची गेम स्ट्रिमिंग साईट Twitch च्या सीईओ पदाची जबाबदारी होती. त्यांनी यावर्षाच्या सुरूवातीलाच हे पद सोडलं होतं. OpenAI Sacks CEO Sam Altman: ओपनएआयचे संस्थापक सॅम ऑल्टमनला CEO पदावरून हटवले, काय आहे कारण? जाणून घ्या .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)